१९९२ साली पतसंस्थेची स्थापना होत असताना बँक ऑफ कराडचे दिवाळे वाजले होते. यामुळे पतसंस्थेकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ नव्हता अशा परिस्थितीत संस्थेचे संस्थापक चेअरमन प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी व संस्थेचे संस्थापक ऑनररी सेक्रेटरी प्राचार्य जी. एस. कुलकर्णी हे दोघेही सहकार क्षेत्रातील गाढे अभ्यासक. सहकार क्षेत्रातील आदर्श सिद्धांताची प्रतिमा जपणारी एखादी सहकारी संस्था सुरू करावी हा त्यांचा सदभाव याच वेळी काही सन्मित्रांच्या सहकार्याने २ मे १९९२ रोजी श्री दत्त नागरी पतसंस्थेची स्थापना झाली. प्रत्यक्ष कामकाज १५ जून १९९२ मध्ये१० बाय १० च्या खोलीत सुरू करण्यात आले.

पतसंस्थेच्या औपचारिक उदघाटन प्रसंगी सुद्धा सहकारी क्षेत्रातील एका पदाधिकारी व्यक्तिने “ कोणतीही पतसंस्था मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतल्याशिवाय सभासदांना कर्ज वाटप करू शकत नाही “ असे वक्तव्य केले होते. पण आज तीच श्री दत्त नागरी संस्थेने २८ वर्षात एकदाही मध्यवर्ती बँकेचे कर्ज न घेता स्वभांडवलावर ठेवीतून कर्जवाटप करत असताना अन्य बँकातही ठेवी ठेवत आहे.

अकौंटस मधील ज्ञान असणारे व्यक्तिमत्व मा.प्राचार्य जी.एस.कुलकर्णी व सहकारातील ज्ञान असणारे व्यक्तिमत्व मा. प्राचार्य डॉ. पी.बी.कुलकर्णी यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यतच्या प्रवास पाहता संस्थेचा वटवृक्ष करण्यामध्ये भरीव योगदान देऊन सहकार तसेच बँकिंग आणि आर्थिक नियंत्रण पद्धती यांचा विचार करून कर्ज व्यवहारानंतर ताळेबंदाची जिंदगी दर्शवणारी दुसरी महत्वाची बाजू म्हणजे गुंतवणूक ही कर्ज व्यवहारा इतकी फायदेशीर नसली तरी C.R.A.R तसेच S.L.R यांचा नियमित आढावा घेऊन उत्पन्नक्षम कर्जपुरवठा व शिल्लक निधीचे योग्य व्यवस्थापन करून वैधानिक तरलता राखण्याच्या दृष्टीने अन्य सक्षम शेड्यूल्ड बँकेतून गुंतवणूक केलेली आहे.

आजमितीस पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे, ती फक्त तत्पर सेवा, चोख व्यवहार, पारदर्शकता आणि विश्वासार्हता यामुळेच स्थापनेपासून सतत ‘अ’ वर्ग मिळत असताना पतसंस्थेकडे असलेला ठेवीचा ओघ सतत वाढतच आहे. एकही वर्षी वाढीचा वेग कमी झालेला नाही हा वाढणारा ओघ व्याजदारमुळे नसून फक्त विश्वासामुळे आहे.

पतसंस्थेमध्ये असलेल्या ठेवीवर कर्ज वाटप करणे हा पतसंस्थेचा मुख्य व्यवसाय आहे. कर्जाचे एकूण ठेवीशी प्रमाण राखत असताना पतसंस्थेने प्रामुख्याने मेंबर कर्ज, व्यवसाय कर्ज, स्थावरतारण,वाहनतारण, आकस्मित कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज असे स्वरूप ठेवले असून कर्जावरील व्याजचे दर ११% ते १५% व कर्ज मर्यादा कमाल ४० लाख रु इतकी आहे. सी. डी. रेशोचे प्रमाण राखताना पतसंस्थेकडे ३१ मार्च २०१९ अखेर रु. ४६,४५,४६,०२६/- इतके येणे कर्ज आहे. अत्यंत काळजीपूर्वक कर्ज वितरण करत असताना कर्जदारांचा अपघात विमा उतरून त्यांच्या जीविताची आणि संस्थेची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी हमी घेतली आहे.

संस्थेची स्थिरता ही संस्थेचे भागभांडवल व गुंतवणूक यावर आधारलेली असते. ठेवी व कर्ज वाटपा बरोबर पतसंस्थेचे भाग भांडवल रु. ३,४६,०१,४००/- इतके असून स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने सभासदांना १२% ते १५% दराने डिव्हिडंड वापर केले आहे. संस्थेकडे ७४९.५३ लाख रुपये इतका स्वनिधी उपलब्ध असून या निधीची संस्थेने स्वतंत्रपणे गुंतवणूक इतर बॅंकामध्ये केलेली आहे. त्याच बरोबर पतसंस्थेची बँकेतील गुंतवणुक रु.२६,२७,३९,७४१/- इतकी आहे. सलग सात ते आठ वर्षे पतसंस्थेने १००% एन. पी. ए. ची तरतूद केली असुनही संस्था नफ्यात आहे. ३१ मार्च २०१९ अखेर एन. पी. ए. 0 % व थकबाकी ३.१७% इतकी ठेवण्यात संस्थेने यश मिळवले आहे.

आर्थिक व्यवहाराबरोबर समाज परिवर्तनाच्या सदभावनेने श्री दत्त नागरी पतसंस्थेने यापूर्वी अनेक उपक्रमही यशस्वीपणे संपन्न केले आहेत. डंकेल प्रस्तावाचे वेळी प्रबोधनपर चर्चासत्रे, पतसंस्थेच्या मेळाव्यातून मार्गदर्शन करणे, अर्थविषयक मार्गदर्शनपर शिबीर आयोजित करणे, सहकार क्षेत्रातील दोष व अडचणी यावर चर्चासत्रात मार्गदर्शन करणे, अशा विविध मार्गाने संस्थेने समाजास उपयुक्त अशी सेवा देत असताना समाजाशी सतत संपर्क ठेवला आहे. तसेच पतसंस्थेने जलसाक्षरता अभियानांतर्गत रु २५०००/- खर्च करून मौजे रेठरेधरण(ता.वाळवा) येथील तलावातील ९०० ब्रास गाळ उपसून दिला आहे, यामुळे ९ लाख घनफूट पाण्याचा जादा साठा होऊन गावचा विकास साधला गेला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियनांतर्गत इस्लामपूर शहरातील झाडांचे संरक्षण होण्यासाठी रु.१०००० /- खर्च करून ट्री गार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच शिराळा येथे पूल गल्ली परिसरात बोअर मारून त्यावर हातपंप बसवून परिसरातील लोकांची सोय करून दिली आहे. आचार्य जावडेकर गुरुकुल इस्लामपूर यांच्या भारतमाता विद्यार्थी वसतिगृहास पिठाच्या गिरणीसाठी अर्थसाहाय्य करून गोरगरीब व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांचा वसतीगृहाकडून होणा-या विकासास थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यंग जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर यांचे द्वारा इस्लामपूरमधील मतिमंद मुलांच्या शाळेस सेन्सरी रीप खरेदीसाठी मदत केली आहे. मागील वर्षी आचार्य जावडेकर गुरुकुलला गॅसशेगडी व मोठी पातेली देऊन मुलांच्या स्वयंपाकाची सोय करून दिली आहे. पतसंस्थेचे आर्थिक व्यवहाराचे कार्य चालू असताना पतसंस्थेस समाजाच्या विकासाचा विसर पडलेला नाही समाजाची उन्नती करण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी म्हणून पतसंस्थेने सन २०१०- २०११ सालात शिराळा परिसरातील अंगणवाडी केंद्र क्रमांक १६ निकम मळा शिराळा येथील शाळेस बेबी चेअर १५ व टेबल ६ वस्तु स्वरुपात आर्थिक देणगी म्हणून रुपये ५०००/- रक्कम देऊन थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. पतसंस्थेने सन २०१४ – २०१५ सालात पतसंस्थेचे आर्थिक सहाय्याने कार्य चालू असताना पतसंस्थेच्या सामाजिक उन्नती करण्याच्या दृष्टिने सामाजिक बांधिलकी म्हणून पतसंस्थेने इस्लामपूर येथील अपंग शिक्षण मंडळ, संचलित डॉ.व्ही. एस. नेर्लेकर मुक-बधिर विद्यालयातील सभागृहासाठी २५ बाय १० च्या सतरंज्या देऊन रुपये १५०००/- खर्च करून सामाजिक कामात सहभाग घेतला आहे.

संस्थेचा महत्वाचा भाग म्हणजे कर्मचारी पतसंस्थेचे सर्वच कर्मचारी वाणिज्य पदवीधर व जी.डी.सी अँड ए झालेले आहेत तसेच संगणक प्रशिक्षित असून त्यांना सतत व्यावसायिक व्यवस्थापना बाबत जागरूक केले जाते. संस्थापक चेअरमन प्राचार्य डॉ पी बी कुलकर्णी व संस्थेचे संस्थापक ऑनररी सेक्रेटरी प्राचार्य जी. एस. कुलकर्णी हे संस्थेच्या कर्मचा-याना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. पतसंस्था सेवकांना दरवर्षी प्रशिक्षण देणे गरजेचे असते. त्यामुळे संस्थेचे चेअरमन हे सेवक वर्गाचे एक दिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करून लेखी परिक्षा घेऊन त्यावर मार्गदर्शन करत असतात. यापूर्वीही संस्थेने श्री. दत्त नागरी सह.पतसंस्था व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इस्लामपूर यांचे संयुक्त विद्यमाने एक दिवसाचे प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये वाळवा व शिराळा तालुक्यातील पतसंस्था मधील कर्मचा-यानी मार्गदर्शनाचा फायदा घेतला सहभागी प्रशिक्षणार्थी यांना संस्थेमार्फत सर्टिफिकेट देणेत आले होते.तसेच संस्थेचे चेअरमन व व्हा.चेअरमन हे इतर पतसंस्थाना व बँकांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात शिवाय संस्था कार्यालयातही वेळोवेळी येणा-या इतर पतसंस्थेच्या तसेच बँकेच्या कर्मचारी व अधिकारी वर्गाला मार्गदर्शन करत असतात. अशाप्रकारे ज्ञानदानाचे काम संस्थेमार्फत सुरू असते. सध्या पतसंस्थेकडे २५ कायम स्वरूपी कर्मचारी आहेत तसेच २० पिग्मी एजंट सेवकवर्ग आहे. संस्थेच्या कर्मचा-याना संस्थेने भविष्य निवार्ह निधीची सुविधा तसेच सहकारी खात्याच्या नियमाप्रमाणेच रजेच्या सुविधा दिल्या आहेत. संस्थेने कर्मचारी व पिग्मी एजंट यांच्यासाठी ११% दराने वाहनतारण कर्ज दिले आहे. दरवर्षी सर्व पिग्मी एजंट यांच्यामध्ये निकोप स्पर्धा घेऊन जास्तीजास्त पिग्मी गोळा करणा-या पिग्मी एजंटना वार्षिक सभेमध्ये बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले जाते.

व्यवसाय करणा-या कोणत्याही प्रकारच्या संस्थेमध्ये व्यवस्थापन महत्वाचे आहे. या व्यवस्थापणामुळे संस्थेची प्रतिमा ही उत्तम रहावी वाढत रहावी हे उद्दीष्ट ठेवले जाते. याच व्यवस्थापणाच्या आधारे कर्मचारी वर्गाने व्यवसाय चालवणे ही त्याची जबाबदारी असते.म्हणून अशा प्रकारचे व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेने कर्मचा-याच्यासाठी शिस्त नियम करणे आवश्यक आहे. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने कर्मचारी वर्गासाठी सन २०१०-२०११ या आर्थिक वर्षापासून कर्मचारी सेवानियम तयार केले आहेत. यामध्ये व्याप्ती, व्याख्या, सेवा, नेमणूक, शैक्षणिक पात्रता,वेतनश्रेणी, बढती, बदली, भत्ते,वेतनवाढ , भविष्यनिर्वाह निधी, रजा, सुट्या, गोपनीय, अहवाल, सेवानिवृत्ती अशा वेगवेगळ्या नियमांचे सेवानियम तयार केले आहेत. यामुळे कर्मचा-याचे एकमेकांशी, वरिष्ठांचे, कर्मचा-याचे संचालकांशी चांगले संबंध राहतील.या सेवानियमामुळे कर्माच्या-याच्या मनात संस्थेची प्रतिमा, संस्थेबद्दलची आत्मीयता, संस्थेबद्दलचा विश्वास निश्चित वाढत राहील यादृष्टीने सेवानियम व सेवा पुस्तिका तयार केली आहे.

संस्थेने समाजाशी तसेच सभासदांशी असणारी बांधिलकी सांभाळून नफा वाढीसाठी प्रयत्न करत असताना इतर उत्पन्नाचे मार्ग शोधत असतानाच पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा मार्फत वीज बील स्वीकारण्यासाठी मंजूरी मिळाली असून वीज बील स्वीकारणे सुरू आहे त्यामुळे परिसरातील ग्राहकांना याचा निश्चित फायदा होत आहे. सामाजकार्याची इतकी भरीव कामगिरी करत असताना संस्थेचे संचालक मंडळ निस्वार्थी मानाने समाजासाठी तसेच संस्थेसाठी झटत असते. संचालक मंडळाने व्यवस्थापनाचे केलेले आर्थिक नियोजन, पारदर्शक कारभार, शासन धोरण व आदर्श पोटनियम यांचे भान ठेवून काम करत असताना सभासद आणि ग्राहकवर्ग यांचा दृढविश्वास यामुळे संस्थेला सन २००३-२००४ व सन २००५- २००६ तसेच सन २०१०- २०११, २०११- २०१२ व २०१२ – २०१३ चा सलग तीन वर्षाकरिता सांगली जिल्हा नागरी सह पतसंस्था फेडरेशन मार्फत सांगली जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थामधून शहरी विभागाकडून दिला जाणारा जिल्हा आदर्श पतसंस्था पुरस्कार ५ वेळा मिळाला आहे. या पुरस्कारमुळे संस्थेने सांगली जिल्हातील सहकार क्षेत्रात मानाचे स्थान पटकाविले आहे.

  • पश्चिम महाराष्ट्र पतसंस्था पुरस्कार :

महाराष्ट्रातील नागरी बँका आणि सहकारी पतसंस्था यांच्या साठी सहकार सुगंध प्रतिबिंब नावाने वार्षिक अ‍हवाल स्पर्धा ( आर्थिक वर्ष २०१०-२०११) आयोजित केली होती. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ३०० ते ३५० पतसंस्थानी सहभाग घेतला होता, सहकारी संस्थेने वर्षभरात घेतलेले कष्ट, नियोजन आणि यश प्राप्ती यांचे प्रतिबिंब वार्षिक अहवालात उमटताना दिसते. संस्थेची कामगिरी, वाढीचा वेग ऑडिट रेटिंग याबरोबरच अहवालाची मांडणी आणि सुबक छपाई हे निकष या स्पर्धेस महत्वाचे ठरले.

  • दीपस्तंभ पुरस्कार :

महाराष्ट्र शासन सहकार विभाग व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०१२ व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षनिमित्त शिर्डी जिल्हा अहमदनगर या साईबाबांच्या पुण्यनगरीत श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या इस्लामपूर या पतसंस्थेस महाराष्ट्रातील सहकारी चळवळीमधील संकटावर मात करीत दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केल्याबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा, सन्मानाचा, “दीपस्तंभ पुरस्कार” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना.श्री पृथ्वीराज चव्हाण यांचे शुभहस्ते व मा. ना.श्री हर्षवर्धन पाटील सहकारमंत्री यांचे उपस्थित मिळाला.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई यांचेकडून दुस-यादा ३१ जूलै २०१६ रोजी सापुतरा ( नाशिक ) येथे दीपस्तंभ पुरस्कार २०१६

  • सहकार भूषण पुरस्कार :

श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थेस पुणे विभागातून महाराष्ट्र शासन सहकार विभागामार्फत सन २०१४ चा सर्वोच्य मानाचा “ सहकार भूषण पुरस्कार “ व रूपये ५१,०००/ रोख व मानपत्र मा. ना.श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते, मा. ना.श्री चंद्रकांत दादा पाटील सहकार, पणन, वस्त्रौद्योग, मा. ना.श्री एकनाथ खडसे मंत्री महसूल यांचे उपस्थितीत शुक्रवार दिनांक १९.०६.२०१५ रोजी कोल्हापूर येथे मिळाला आहे.

  • मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टचे राज्यस्तरिय व राष्ट्रीय पुरस्कार :

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ( रजि ट्रस्ट ) मुंबई या उपक्रम संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक ०८.१२.२०१५ रोजी अष्टक्षेत्रीय गुणिजण, महासंभेलन २०१५ चे शानदार आयोजन मुंबई महानगरात दादर येथे आयोजित केले होते. आपले संस्थेस “ महाराष्ट्र गुणिजण रत्न गौरव पुरस्कार २०१५” देऊन सन्मान केला आहे. त्याचप्रमाणे दिनांक १२.०१.२०१६ रोजी मनुष्य विकास लोकसेवा अकादमी ट्रस्टचे “भारत ज्योती प्राइड ऑफ नेशन एक्सलेन्स अवॉर्ड २०१६” राष्ट्रीयपुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

  • सलग ऑडिट वर्ग अ.
  • सातत्याने सलग सभासदांना डिव्हिडंड वाटप
  • जिल्हा आदर्श पतसंस्था पुरस्कार पाच वेळा संपादन
  • पश्चिम महाराष्ट्र पुरस्कार व प्रतिबिंब पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य फेडरेशन व सहकार खाते दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त
  • मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमी ट्रस्टचे राज्यस्तरिय व राष्ट्रीय पुरस्कार