निवेदन
दत्त च्या अर्थाप्रमाणे व्यवहार करणारी दत्त पत संस्था- सागाव शाखेचा ६ वर्धापनदिन——- सन १९९२ साली स्वर्गीय जी.एस.कुलकर्णी,प्राचार्य डॅा.पी.बी.कुलकर्णी यांनी शिराळा व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तिंना घेऊन श्री दत्त नागरी पत संस्थेची स्थापना केली.संस्थेला नाव देताना विचार करून दत्त नाव दिले.दत्त केवळ परमेश्वर आहे म्हणून नाव दिले नसुन त्यांच्या मागचा व्यापक अर्थ लक्षात घेऊन हे नाव दिले.संस्कृत मध्ये दत्ताचा अर्थ “ देणारे, दिलेले “ असा आहे.संस्थेने दत्ताच्या अर्थाप्रमाणे ग्राहकाना,समाजाला आर्थिक स्थैर्य दिले,समृद्ध केलेआहे.आज संस्थेच्या चार शाखा असुन २०० कोटी रूपयाचा व्यवसाय आहे.आज संस्थेच्या सागाव शाखेचा ६ वर्धापनदिन आहे सागावचे सुपुत्र सह.सचिव महाराष्ट्र राज्य हक्क सेवा आयोग माणिक दिवे,सरपंच सौ.अस्मिता पाटील,उपसरपंच शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे त्यानिमित्ताने थोडक्यात .. दत्त नागरी पत संस्था उरूण इस्लामपूर हि संस्था जरी ३३ वर्षांपूर्वी स्थापन झाली व सागाव शाखा १ जानेवारी २०१९ रोजी आयकर आयुक्त अभिनय कुंभार व जेष्ठ साहित्यिक प्रा.वैजनाथ महाजन यांच्या हस्ते श
1. दत्त च्या अर्थाप्रमाणे व्यवहार करणारी दत्त पत संस्था- सागाव शाखेचा ६ वर्धापनदिन——- सन १९९२ साली स्वर्गीय जी.एस.कुलकर्णी,प्राचार्य डॅा.पी.बी.कुलकर्णी यांनी शिराळा व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तिंना घेऊन श्री दत्त नागरी पत संस्थेची स्थापना केली.संस्थेला नाव देताना विचार करून दत्त नाव दिले.दत्त केवळ परमेश्वर आहे म्हणून नाव दिले नसुन त्यांच्या मागचा व्यापक अर्थ लक्षात घेऊन हे नाव दिले.संस्कृत मध्ये दत्ताचा अर्थ “ देणारे, दिलेले “ असा आहे.संस्थेने दत्ताच्या अर्थाप्रमाणे ग्राहकाना,समाजाला आर्थिक स्थैर्य दिले,समृद्ध केलेआहे.आज संस्थेच्या चार शाखा असुन २०० कोटी रूपयाचा व्यवसाय आहे.आज संस्थेच्या सागाव शाखेचा ६ वर्धापनदिन आहे सागावचे सुपुत्र सह.सचिव महाराष्ट्र राज्य हक्क सेवा आयोग माणिक दिवे,सरपंच सौ.अस्मिता पाटील,उपसरपंच शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे त्यानिमित्ताने थोडक्यात .. दत्त नागरी पत संस्था उरूण इस्लामपूर हि संस्था जरी ३३ वर्षांपूर्वी स्थापन झाली व सागाव शाखा १ जानेवारी २०१९ रोजी आयकर आयुक्त अभिनय कुंभार व जेष्ठ साहित्यिक प्रा.वैजनाथ महाजन यांच्या हस्ते शाखेचा शुभारंभ झाला.सागाव परिसर म्हणजे वारणाकाठ एकुणच समृद्ध म्हटल्यास वावगे ठरणार नाही.या समृद्धीमधे आर्थिक भर पडावी म्हणून दत्त च्या या शाखेने खारीचा वाटा उचलला आहे.येथील माणसे जशी आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहेत तसेच ती वैचारीक दृष्ट्याही समृद्ध आहेत,प्रामाणिक आहेत.त्यामुळे शाखा चालवताना कधीही अडचण आली नाही.या परिसरातील ठेवीदारांनी शाखेवर विश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणात ठेव ठेऊन समृद्ध केले तसेच शाखेने कर्जदाराना कर्जपुरवठा करून त्यांचे व्यवसाय समृद्ध केले.थोडक्यात ग्राहक,सभासद आणि शाखेची देवाणघेवाण योग्य पद्धतीने सुरू आहे.आज सागाव,वाडीभागाई, नाटोली, चिखली,कणदूर,पुनवत तर शाहूवाडी तालुक्यातील सरूड,बांबवडे इत्यादी गावात हि पतसंस्था घराघरात पोहोचली आहे.या शाखेच्या कर्मचाऱ्यांमुळे हि संस्था आपली वाटते. सागाव व परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतात त्यांना बहुतांश कर्जपुरवठा दत्त नागरीने केला आहे.येथील महिलांना व्यवसायाची दृष्टी आहे.या महिला छोटी कर्ज घेऊन व्यवसाय करतात,हप्ते वेळे भरतात, कर्ज मुदतीच्या आधी फेडतात.पुन्हा कर्ज घेतात असे चक्र सतत सुरू असते.अल्प भांडवल असताना उत्तुंग झेप घेणाऱ्यांची आपण उदाहरणे देत असतो.लिज्जट पापडांची कहाणी आचंबीत करणारी आहे.केवळ ८० रूपये कर्जावर जसवंतीबेन पोपट यांनी १९५९ साली सात महिलांच्या मदतीने पापड व्यवसाय केला.आज या उद्योगाची उलाढाल २००० कोटीपेक्षा जास्त आहे. या उद्योगात ४०,००० महिला काम करतात.आपल्या भागातील उदाहरण झाले तर चितळे उद्योग समुह होय ! प्रारंभी अल्प भांडवलावर व्यवसाय सुरू करून आज ते दूधसम्राट म्हणून व्यवसाय करत आहेत.अशी शेकडो उदाहरणे देता येतील हे सर्व विवेचन करण्याचे कारण की श्री दत्त नागरी पत संस्थेकडून अनेक महिलांनी पन्नास हजार ते एक लाख रूपये कर्ज घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केले आहेत.प्रारंभी एक गाय नंतर दोन नंतर चार नंतर सहा अशी वाढ होत आहे. म्हणजे कांही वर्षांनी सागाव येथील महिला( पुरूष सुध्दा ) यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येणार यात शंका नाही.आज जगापुढे लिज्जत पापड च्या जयवंतीबेन पोपट चे उदाहरण दिले जाते.उद्याच्या काळात सागाव येथील नागरिकांची उदाहरणे दिली जातील यात शंका नाही.यात श्री दत्त नागरी पत संस्थेचा यशस्वी मदतीचा हात असणार हे संचालक मंडळाला भूषणावह आहे. .. सागाव शाखेत ५३३ लोकांना कर्जे दिली असुन त्यातील ४९८ ग्राहकांना एक लाख ते दिड लाख रूपयांची कर्जे दिले आहे.त्यातसुद्धा दोनशे पेक्षा जास्त महिला कर्जदार आहेत.हे सर्व कर्जदार अत्यंत योग्य पद्धतीने कर्ज फेड करून परत कर्ज घेत आहेत.हे अव्याहतपणे चक्र सुरू असुन व्यवसाय शीघ्र गतीने वाढत आहे.सागाव गावातील सौ.सविता पाटील,सौ.नंदाताई पाटील,सौ.वंदना पाटील,उज्वला पाटील,वंदना लोहार अशा शेकडो महिला अत्यंत सचोटीने व्यवसाय करून सागावच्या अर्थव्यवस्थेला गती देत आहेत.अर्थात पुरुष सुद्धा महिलांच्या बरोबरच किंबहुना जास्त परिश्रम घेऊन गावाला समृद्धीच्या दिशेने नेत आहेत.३० डिसेंबर रोजीच्या सागाव शाखेच्या ठेवी ७,४४,२२,७७१ रूपये असुन कर्ज वाटप ६,४६,०५,९४२ रूपये झाले आहे.शिराळा तालुक्याचा विचार केला तर दत्तच्या सागाव व शिराळा शाखेच्या माध्यमातुन आर्थिक विकासात मोठे योगदान आहे.शिराळा शाखेच्या ३० डिसेंबर रोजीच्या ठेवी ३३,०७,७८,५८७ रूपये असुन कर्जवाटप २६,८९,२२,६९२ इतके झाले आहे.शिराळा तालुक्यातील दोन्ही शाखांचा एकत्रित विचार केला तर दत्त नागरीच्या तालुक्यातील ठेवी तब्बल ४०,५२,०१,३५८ रूपये असुन तालुक्यात दत्त नागरीने ३३,३५,२८,६३३ रूपयाचे कर्ज वाटप केले आहे.राष्ट्रीयकृत बॅंकांना जी प्रगती साधता आली नाही ती प्रगती दत्तच्या दोन्हीही शाखांनी केली आहे.सागाव शाखेचे वय केवळ सहा वर्ष असुन बाल्यावस्थेतील प्रगती पाहून अनेकजण आश्चर्यचकित होतात.या शाखेचे नेतृत्व शाखा प्रमुख सुमंत महाजन,शाखाधिकारी दिपक साळवी,कर्मचारी सौ. वारणा टिंगरे,अमित सुतार,विनायक पाटील,विनोद टिके करत असुन संस्थेचे डोळे म्हणजे धनवर्धीनी प्रतिनिधी सर्वश्री किरण फातले,अशोक पाटील,ज्ञानदेव पाटील,संतोष पाटील आणि धनाजी आसवले त्यांना मदत करत आहेत. आज दत्त नागरी पत संस्थेचा वटवृक्ष झाला आहे.२०० कोटी रूपयाचा व्यवसाय करणाऱ्या या संस्थेची धुरा संस्थापक चेअरमन प्राचार्य डॅा.पी.बी.कुलकर्णी,चेअरमन प्रा.डॅा.श्रीकांत चव्हाण,व्हा.चेअरमन बी.टी.निकम,सुमंत महाजन,दिनेश हसबनीस,श्रीमती सुनीता कुलकर्णी,सौ सुखदा महाजन,सुमंत कुलकर्णी,अमित कुलकर्णी,दिलीप फल्ले, सोमाजी कोळेकर,सुभाष खिलारे,सी.ए.यु.जी.डफळापूरक,कार्यलक्षी संचालक संजय हिरवे करत आहेत.या संस्थेने अनेक मापदंड निर्माण केले आहेत.संस्थेची स्वःमालकीची तीन मजली इस्लामपूर येथे आहे तर शिराळा शाखेने स्वतःची इमारत खरेदी केली आहे.स्वतःचे डाटासेंटर तसेच सर्व शाखा संगणकीकृत आहेत.चारही शाखांत सोलर सिस्टिम,इस्लामपूर येथे वॅाटर एटीएम,बालकासाठी हिरकणी कक्ष,ग्रंथालय,कर्मचारी वर्गासाठी भविष्यनिर्वाहनिधी,सेवानियम व सेवापुस्तिका,स्थापनेपासून आज अखेर ३३ वर्ष सतत ॲाडीट वर्ग “ अ “, प्रभावी अर्थकारण व व्यावसायिकता,सामाजिक बांधिलकी,स्थापनेच्या पहिल्या वर्षापासून लाभांश देणारी एकपतसंस्था,३३ वर्षात एकही जप्तीची कारवाई नाही,चारही शाखेतील सर्व कर्मचारी जी.डी.सी.ए . परिक्षा उर्त्तीण अशा संस्थेला आज पर्यंत महाराष्ट्र शासनाचा मानाचा व प्रतिष्ठेचा सहकार भूषणसह १८ मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेचा आर्थिक पाया भक्कम आहे हे पुढील आकडेवारी वरून लक्षात येते ( आकडे ३० डिसेंबर रोजीचे ) सभासद ९३६५,शेअर्स ६,१३,५७,७०० रूपये,रिझर्व फंड १२,१२,७७,६२२ रूपये, ठेवी ११५,६७,१४,४६१ रूपये, येणे कर्ज ८३,५६,३२,५५४ रूपये, बॅंक गुंतवणूक ३६,०४,७२,३९९ रूपये,खेळते भांडवल १४२,३८,३२,९३८ रूपये,व्यवसाय १९९,२३,४७,०१५ रूपये आणि प्रति सेवक व्यवसाय ५,१०,८५,८२० रूपये आहे.संस्थेचे ब्रीद आहे सुरक्षितता,द्रव्यसंचय,द्रव्यवृद्घी व विश्वासार्ह सेवा यावरूनच संस्थेचे ध्येय लक्षात येते….., ——————चौकट————— आज सर्व जग डिझिटल व्यवहाराकडे वळले आहे.दत्त नागरी पत संस्थेने दमदार पाऊल टाकले आहे. ८ जानेवारी २०२५ रोजी संस्थेचे बॅंकींग ॲप सुरू होत आहे.त्याचा शुभारंभ ८ तारखेला इस्लामपूर येथे दुपारी ३ वाजता रिझर्व्ह बॅंकचे संचालक सतीश मराठे,माजी मंत्री आण्णासाहेब डांगे व सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे यांच्या हस्ते होणार आहे.बुधवार पासून ग्राहकांना घरी बसुन मोबाईलद्वारे पैसे हस्तांतरित,आर.टी.जी. एस. इत्यादी करता येणार आहे. ——————————————— फोटो - संस्थापक प्राचार्य डॅा.पी.बी. कुलकर्णी• चेअरमन प्रा.श्रीकांत चव्हाण• व्हा.चेअरमन बी.टी.निकम• शाखा प्रमुख सुमंत महाजन.. सुमंत महाजन - विशेष प्रतिनिधी शिराळा
ऑफिस वेळ : स. ११:०० ते दु. २:०० दु. २.३० ते सायं. ६.०० कॅश व्यवहार: स. ११:०० ते दु. २:०० दु. २:३० ते सायं. ५:३०
वीज बिल भरणा: सायंकाळी ५ वाजेपर्यंत
NEFT/RTGS साठी पतसंस्थेचा अकाऊंट नंबर साठी येथे क्लिक करा.
पतसंस्थेची स्थापना २ मे १९९२ रोजी सहकार महर्षि मा.श्री. बापूसाहेब पुजारी यांच्या शुभ हस्ते उद्घाटनाने झाली. १० बाय १० च्या खोलीत १ टेबल २ खुर्च्या एवढाच प्रपंच, आज अखेर १ पै ची मदत कर्ज रूपाने बाहेरून न घेता स्व बळावर संस्थेचे कामकाज सुरू आहे. आपला आर्थिक हिशोब १०० पैशात मांडणारी एकमेव संस्था आहे.
स्थापनेपासून आज अखेर सातत्याने चढत्या क्रमाने ठेववृद्धी, कर्जवृद्धी, नफावृद्धी करून १५ % लाभांश देणारी व संस्था स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग “अ” मिळवणारी संस्था.
लॉकर सुविधा, लिफ्ट सुविधा, प्रशस्त सभागृह
स्वमालकीची इमारत, स्वत:चे डेटासेंटर, हेड ऑफिस व सर्व शाखा संगणकीकृत
सोलर पॉवर सुविधा, शुद्ध पेयजल वॉटर एटीएम सुविधा
पतसंस्थेच्या सर्व शाखांकडे विजबिल भरणा केंद्र सुविधा
स्थापनेपासून आज अखेर ऑडिट वर्ग “अ” असलेली एकमेव पतसंस्था
सर्व निधींची १०० % जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुंतवणूक
स्थापनेपासून आज अखेर नफा असलेली एकमेव पतसंस्था
स्थापनेपासून सभासदांना सातत्याने १० % ते १५ % लाभांश देणारी पतसंस्था
कर्नाडस् बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फौंडेशन कोल्हापूर यांचा सर्वोत्तम नागरी सहकारी पतसंस्था पुरस्कार प्राप्त पतसंस्था.
पतसंस्थेकडील कर्मचारी प्रशिक्षित आणि जी.डी.सी.ए परीक्षा उत्तीर्ण
पतसंस्थेकडील कर्मचारी यांचेसाठी भविष्य निर्वाहनिधी व पेंशन
पतसंस्थेकडील कर्मचारी यांचेसाठी सेवानियम व सेवापुस्तिका
कर्ज खात्यांना सरळव्याज पद्धतीने व्याज आकारणी
कर्ज व बचत खात्यास कोणतेही छुपे चार्जेस नाहीत
स्थापनेपासून आजअखेर एकही जप्तीची कारवाई केलेली नाही
ग्राहकांसाठी विनामूल्य एनईएफटी व आरटीजीएस सुविधा
बँको पतसंस्था सहकार परिषद २०२० या राज्यस्तरीय निवासी परिषद व बँको पतसंस्था, ब्लू रिबन २०२१ पुरस्कार प्राप्त.
सहकार संस्थेबद्दल समाजात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आशा वेळी या संस्थेने अतिशय धीमेपणाने, ठेवी, कर्जव्यवहार, व वसुली या सगळ्या आघाडीवर चांगले काम करून संस्था प्रगती पथावर ठेवली आहे.
ग्रामीण भागात व संस्थेची आर्थिक वाटचालाची स्थिती फारच चांगली वाटली. संस्था ग्राहकांना देत असलेल्या सेवा पाहून एखाद्या कार्पोरेट संस्था / बँका देत असलेल्या सेवांची आठवण झाली . संस्थेची अशीच उत्तरोत्तर क्रांती होवो हीच शुभेच्छा.
पतसंस्थेची इमारत सुविधा या संदर्भात माहिती घेतली सुसज्ज इमारत हि आदर्शवत आहे नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा उच्च प्रतीच्या दिसून आल्या नवनवीन तंत्रज्ञान जसे डेटासेंटर cbs प्राणाली सोलर एनर्जी आरो वॉटर प्युरिफायर प्लॅन्ट इ गोष्टींचा करण्यात येणारा वापर हा नक्कीच एक चांगला उपक्रम आहे समाजसेवा जपणारे कार्यक्रम -आधार नोंदणी या सारखे उपक्रम दिसून आले.
संस्थेच्या नवीन इमारतीचे उदघाटन व गुरुवर्य प्रा जी एस कुलकर्णी सरांच्या नावाने हॉल चे उदघाटन करण्याचे भाग्य मला लाभले. सर्व सामान्यांचे आर्थिक हित साधण्यासाठी हि संस्था या पुढेही हिरीरीने भाग घेईल व उत्तुंग यश संपादन करील.
Unique design healthy atmosphere. I meet chairman as well as who is deaply knowledgeable datacenter is with all required activites , require for data privacy and security wish u all very all the best future.
महाराष्ट्र हि जशी संतांची जन्म भूमी म्हणून ओळखली जाते त्याप्रमाणे सहकाराची जननी म्हणून प्रचलित आहे पतसंस्थेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख असलेने पतसंस्था यशसच्या शिखरावर विराजमान झालेली आहे प्रत्येक संचालक विश्वास्थाच्या भूमिकेमुळे पतसंस्थेने दैदिप्यमान यश मिळवले प्रा डॉ श्री पी बी कुलकर्णी यांचे निस्पृह वर्तनामुळे संस्थेला एक प्रकारची शिस्त आहे स्त्री हि एक व्यक्ती नसून शक्ती होय याचे मूर्तिमंत उदाहरण चेअरमन सुनीता कुलकर्णी होय.