सभासद व ग्राहकांसाठी सायबर सुरक्षे विषयी सूचना -

१. आपला पासवर्ड व पिन अवघड ( कॉम्प्लेक्स ) सेट करा.

२. पासवर्ड मध्ये स्मॉल, कॅपिटल अक्षरे तसेच सिम्बॉल याांचा वापर करा.

३. पासवर्ड दर पंधरा दिवसांनी बदलत रहा.

४. पूर्वी वापरलेला पासवर्ड किंवा पिन पुन्हा वापरू नका.

५. सर्व सामान्य पासवर्ड म्हणजेच admin, password, 123, 1234, qwerty इत्यादी वापरू नयेत.

६. आपल्या गाडीचे नंबर, जन्म तारीख इत्यादी पासवर्ड म्हणून वापरू नये.

७. आपले पासवर्ड मोबाइलमध्ये सेव्ह करू नयेत.

८. कोणत्याही परिस्थितीत आपला पिन नंबर, ATM Card Number, OTP इत्यादी फोन वरून कोणालाही साांगू नये.

९. अनोळखी व्यक्तीच्या कॉम्पुटर वरून आपला ई-मेल अकाऊंट वापरू नये.

१०. मोबाइलवरून इंटरनेट वापरण्यापूर्वी licensed antivirus इन्स्टॉल करावे. व नियमित update करावे.

११. मोबाइल मध्ये कोणतेही ऍप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याने मागितलेल्या परमिशन नीट वाचाव्यात. कॅमेरा किंवा कॉन्टॅक्ट वापरण्याची परमिशन देऊ नये.

१२. आपला मोबाइलला पिन किंवा पॅटर्न लॉक सेट करा.

१३. आपला जुना मोबाइल दुसऱ्याला देताना फॅक्टरी रीसेट करून द्या. तसेच त्यातील सिम कार्ड व मेमरी कार्ड दुसऱ्याला वापरायला देऊ नये.

१४. सर्च इंजिन (उदा. Google) वापरताना समोर आलेल्या Site ची खात्री करून मगच ती ओपन करा.

१५. अनोळखी किंवा काही आमिष असलेलया site वर आपली कोणतीही माहिती एंटर करू नये.

१६. ई-मेल द्वारे आलेल्या कोणत्याही ऑफर ना क्लिक करू नये.

१७. शक्यतो https (secured) ने सुरु होणाऱ्या site वापराव्यात.

१८. ATM मध्ये पिन एंटर करताना त्याच्यावर हात धरावा जेणेकरून कॅमेऱ्या मध्ये तुमचा पिन नंबर दिसणार नाही.

१९. कोणत्याही अनोळखी व ओपन वायफाय नेटवर्कला कनेक्ट होऊ नका.

२०. तुम्ही स्वतःचे वायफाय वापरत असाल तर त्याचा पासवर्ड स्ट्रॉंग सेट करा. शक्यतो ssid hide करा.

२१. वायफाय नेटवर्क मध्ये MAC फिल्टर चा वापर करा.

२२. कोणत्याही अनपेक्षित message किंवा फोन संदर्भात तातडीने संबंधित बँक किंवा पतसंस्थेच्या शाखेबरोबर संपर्क करा.